मुंबई : देशातील सर्वात मोठा IPO नुकताच बंद झाला आहे. ह्युंदाई मोटर इंडियाच्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह नव्हता. विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये फक्त 50 टक्के पैसे गुंतवण्यात आले. तर रिटेल कॅटेगरीमध्ये ऑफर केलेल्या समभागांच्या संख्येतून निम्मेच अर्ज प्राप्त झाले होते.
तीन दिवसांनंतर Hyundai Motor India चा IPO एकूण 2.37 पट सबस्क्राइब झाला. ज्यामध्ये कमाल QIB भाग 6.97 वेळा भरला गेला. एनआयआयचा हिस्सा देखील केवळ 60 टक्के झाला. अशा परिस्थितीत रिटेल आणि एनआयआय श्रेणीतून अर्ज केलेल्या सर्व गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. कंपनीने IPO साठी 7 शेअर्सचा लॉट साइज सेट केला आहे.
Hyundai IPO च्या ग्रे-मार्केट प्रीमियम हे सतत घसरत आहे. सबस्क्रिप्शन बंद केल्यानंतर, Hyundai Motor India IPO ची GMP किंमत फक्त 5 रुपयांवर घसरली आहे. त्यानुसार, लिस्टिंगच्या वेळी कमाईची अपेक्षा खूपच कमी आहे, अशी माहिती तज्ज्ञांकडूनही दिली जात आहे.