न्यूयार्क: अमेरिकेतील एका कैद्याला नायट्रोजन वायूद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केनेथ यूजीन स्मिथ असे या कैद्याचे नाव असून, 25 जानेवारी रोजी त्याला ही शिक्षा देण्यात आली. एखाद्या कैद्याला अशा प्रकारे मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केनेथ यूजीन स्मिथ याने 1988 मध्ये पैशांसाठी एका महिलेची हत्या केली होती. त्यानंतर त्याला 1996 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेची अनेक वर्ष अंमलबजावणी झाली नाही. 2022 मध्ये त्याला विषारी इंजेक्शनही देण्यात आले होते, पण त्यातूनही तो वाचला. त्याला 25 जानेवारी रोजी नायट्रोजन वायूद्वारे मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे.
अशी दिली शिक्षा
रिपोर्ट्सनुसार, सर्वप्रथम स्मिथला स्ट्रेचरवर झोपवले, यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला. यातून त्याच्या शरीरात नायट्रोजन वायू सोडला. मास्क लावल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला जवळपास 15 मिनिटे मास्कद्वारे नायट्रोजन दिले गेले. नायट्रोजन वायूमुळे तो काही सेकंदात बेशुद्ध झाला आणि काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला आहे.