Air India : मुंबई : विमान प्रवास करावा, विमानात बसण्याचे स्वप्न असते. सर्वांत आरामदायी आणि सुरक्षित विमान प्रवास मानला जातो. पण तुमचा हा प्रवास दु:ख दायक झाला तर? नुकतीच अशी गोष्ट घडली आहे. एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. वरच्या छतावरून खाली पाणी टपकत असल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे.
WATCH
Mid-flight from Delhi to London Gatwick Airport, Air India Boeing B787 Dreamliner experienced a cabin leak from overhead storage, possibly due to condensation. Cabin crew actively worked to address the situation. pic.twitter.com/9BMPi7pJq5
— Insider Corner (@insiderscorner) November 26, 2023
@insiderscorner या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ ट्विटद्वार शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दिल्ली ते लंडन विमानतळासाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाच्या बोईंग B787 ड्रीमलायनरच्या ओव्हरहेड स्टोरेजमधून अचानक पाणी गळू लागले. यावेळी केबिन क्रूने सक्रियतेने सर्व परिस्थिती हाताळली.
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा गोष्टी फ्लाइटमध्येही होतात, असा प्रश्न विचारत योग्य देखभाली अभावी अशा घटना घडताना दिसत आहेत, असे एकाने म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमान अर्ध्या वाटेत असताना अशी घटना घडली; ज्यामुळे प्रवासीही घाबरले असे दुसरा म्हणाला आहे. मात्र, केबिन क्रूने वेळीच परिस्थिती हाताळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याआधीही एअर इंडियामध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये प्रवासी एकमेकांशी वाद घालताना किंवा भांडताना दिसले होते.