Agriculture GDP : नवी दिल्ली: भारताच्या जीडीपीमधील कृषी क्षेत्राचा वाटा घटला आहे. त्याबाबतची माहिती केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली आहे. 1990-91 साली जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा सर्वाधीक वाटा होता. 35 टक्के असलेला वाटा घसरुन गेल्या आर्थिक वर्षात 15 टक्क्यांवर आला आहे. ही घसरण कृषी जावीएमधील घसरणीमुळं झाली नसून, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात झपाट्यानं सुरु असलेल्या विस्तारामुळं झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादनं आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय.जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर तीन महिन्याला प्रदर्शित होते. देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा जीडीपी चा दर ठरविण्यासाठी विचार केला जातो. एखाद्या देशाचा जीडीपी हा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती प्रदर्शित करीत असतो. प्रत्येक देशामध्ये देशाचा जीडीपीचा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवले जाते. शिवाय कोण कोणत्या क्षेत्रातून देशाला आर्थिक लाभ झाला आहे जीडीपी द्वारे ठरवलं जातं.
गेल्या पाच वर्षांमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राने सरासरी वार्षिक 4 टक्के वाढ नोंदवली आहे. जागतिक अनुभवानुसार, जागतिक जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटाही गेल्या दशकांमध्ये घसरला आहे. अलिकडच्या वर्षांत तो सुमारे 4 टक्के असल्याचे कृषीमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले. ही घसरण थांबवण्यासाठी सरकारनं, कृषी उत्पादकता वाढवणे, संसाधनांचा वापर कार्यक्षमता वाढवणे, शाश्वत शेतीला चालना देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देणे गरजेचे आहे. अशी पावले उचलली पाहिजेत. अनेक विकासात्मक कार्यक्रम, सुनिश्चित करण्यासाठी योजना, सुधारणा आणि धोरणे अंमलबजावणी केली असल्याचे कृषीमंत्री म्हणाले.