भोपाळ : मध्य प्रदेशातील भिंड जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिला रुग्णाच्या सिटी स्कॅनदरम्यान पोटात कात्री आढळून आली.
महिलेच्या पोटात कात्री असल्याचे समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. या महिलेचे दोन वर्षांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये ऑपरेशन झाले होते. ग्वाल्हेरमध्ये ऑपरेशन करताना पोटात कात्री राहिली होती.
याबाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पोटाची २० फेब्रुवारी २०२२ रोजी ग्वाल्हेरच्या एका हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या ऑपरेशनदरम्यान झालेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
ही महिला गेल्या २ वर्षांपासून वेदनेने प्रस्त होती. या संपूर्ण प्रकरणावर आम्ही कोर्टात जाऊन निष्काळजी डॉक्टावर कारवाई करू, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे.