अजित जगताप
सातारा : सर्वसामान्य माणसाला सत्तेमध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. त्यावेळेला अनेकांनी कुचेष्टा करताना सांगितले की, हिमालय फोडण्याचे काम पार घेऊन करत आहेत. पण, आता चार राज्यात पक्षाची वाढ झालेली आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकारात्मकरित्या चिंतन करून पक्ष वाढवावा. असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी वडूज ता. खटाव येथे झालेल्या रा. स. प. माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले कि, १९८४ साली भाजपचे दोन खासदार होते. त्यांनी चिकाटी व जिद्दी वर यश मिळवलेले आता ग्रामपंचायत ते राष्ट्रपती असे भाजपचे आहेत. आपणही आता दोन कार्यकर्ते का होईना पण काम केले पाहिजे.” आपल्या चौकात आपली औकात”’ निर्माण केली तर आपल्याला २८८ पैकी बऱ्याच मतदारसंघात कमी मताने आमदार झालेले आहेत.
त्या ठिकाणी जर आपण निवडणूक लढवली तर आपली ताकद कळून येणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी आपण जरी केली नाही तरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये आपली ताकद निश्चितच वाढविली पाहिजे. वकील, डॉक्टर, अधिकारी यांच्यापर्यंत पक्ष पोहोचवला पाहिजे.
खटावचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या जातीची ५०० मते नसताना ते आमदार झालेत. मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाटचाल करत असताना तीन मराठा, एक वंजारी समाजाचे आमदार केले. आज आपण पाहिलं तर आमदारांची किंमत ही खूप मोठी आहे.
परंतु, आपली स्वतःची किंमत वाढवली पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून आपल्याला खूप मोठे कामाचे संधी आहे. असेही जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री असताना या वडूज नगरीसाठी पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी निधी दिलेला आहे. दुधाचे दर वाढवून दिले. हे लोकांच्या पर्यत पोहचविले पाहिजे. पक्ष वाढविण्यासाठी सभासद करून घेणे गरजेचे आहे. फक्त निवेदन देऊन फोटो व बातम्या करून पक्ष वाढत नाही. कामासाठी प्रचंड गती घेतली पाहिजे.
आपल्याला फक्त निवडणुका लढायच्या नाही तर त्या जिंकायचे आहेत. पक्ष सर्वसमावेशक करण्यासाठी उपेक्षित समाजाला ही संधी दिली पाहिजे. आता सध्या लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र देऊ शकतात. आपण घरणाघर टिपून रा. स. प. कार्यकर्ता तयार केला पाहिजे. असे महादेव जानकर यांनी सांगितले आहे.
प्रारंभी नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तेव्हा पक्षाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे विचारपीठा समोर लोकांच्या मध्ये बसून शांतपणे इतरांची भाषणे ऐकत होते. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीत खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे चिंतन झाले. तसेच वैचारिक बैठक असल्याने पुढील महिन्यात पुन्हा एकदा दि १३ व १४ तारखेला रा. स. प. कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने निश्चितच त्याचा फायदा कार्यकर्त्यांना होणार आहे. असे वातावरण निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. रा स प युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी नेटक्या पद्धतीने सूत्रसंचालन केले. त्याचे राष्ट्रीय नेते यांनी कौतुक करून विनोदाने राजकीय शाब्दिक चिमटे काढले. त्यामुळे सभागृह हास्य विनोदात चांगलेच रंगून गेले. यावेळी बहुजन समाजातील नेते महादेव जानकर साहेब यांच्या समवेत फोटो काढण्यासाठी विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यानी चांगलीच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सरगर, उपाध्यक्ष बबन दादा विरकर, रासप नेते मामू शेठ विरकर, खंडेराव सरक, श्रीकांत देवकर, पूजाताई घाडगे, उमेश चव्हाण, दादासाहेब दोरगे, विलास चव्हाण,डॉ रमाकांत साठे, आकाश विरकर, नितीन कटरे, सुरेखाताई काळेल, दत्ता खांडेकर, निलेश लांडगे, अतुल पवार, विक्रम डोईफोडे, डॉ विनोद खाडे, लालासाहेब माने शिवाजीराव बनसोडे, विश्वास इंगळे ,विष्णू बनसोडे ,अतुल गोरड, सचिन ठेंगील, आबा बरकडे, सचिन वावरे दीपक हरगुडे ,रोहन पवार ,प्रमोद पावडे सचिन इंगळे ,सोईल मुलाणी, संदीप बनसोडे, गंगाराम इंगळे, मनोज घाडगे, अर्जुन माने, संतोष भंडारे, सचिन साठे, निखिल इंदापुरे ,वेदांत तोरणे , दादा तोरणे, अमरजीत कमाने आदी मान्यवर उपस्थित होते.