नवी दिल्ली: राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शुक्रवारी (२९ डिसेंबर) राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरच्या सभागृहात आम आदमी पार्टी (आप) चे नेते म्हणून नियुक्ती करण्याची पक्षाची विनंती फेटाळली. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
ही बाब अशा वेळी समोर आली आहे जेव्हा राघव चड्ढा यांनी नुकतेच राज्यसभेतील निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना मिळाल्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची माफी मागितली होती. त्यांचे निलंबन रद्द करत पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आले.
वास्तविक, राघव चढ्ढा यांच्यावर खासदारांची नावे त्यांच्या संमतीशिवाय जोडल्याचा आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगशी संबंधित विधेयकावरील चर्चेदरम्यान बनावट सह्या केल्याचा आरोप होता. यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले.