Congress leader : काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्या कुटुंबासह विष प्रशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन केल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना छत्तीसगढ येथे घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय-६५, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक १०) यांच्यासह पत्नी नांदणी यादव (वय-५५), मुलगा सूरज यादव (वय-२७) आणि निरज यादव (वय-३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मात्र, या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड शहरातील जंजगीर भागात राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव यांनी 30 ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले यांच्यासह विष प्राशन केले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या सर्वांना बिलासपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
बिलासपूर येथील सिम्स रुग्णालयात उपचारादरम्यान नीरज यादवचा मृत्यू झाला. त्यानंतर पंचराम यादव, दिनेश नंदानी यादव आणि सूरज यादव यांना आरबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 31 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती एएसपी राजेंद्र जैस्वाल यांनी दिली.