Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रसूती सेवकाने दीड महिन्याच्या बाळाला उपचार म्हणून चाळीसहून अधिक जास्त वेळा लोखंडी सळी तापवून चटके दिले आहेत. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील हर्डी गावात घडली आहे.
बाळाला न्यूमोनिया आजार झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, कुटुंबीयांनी ते ना करता पारंपरीक आणि चुकीच्या उपचार पद्धतीचा मार्ग अवलंबला. त्यातून ही भयंकर घटना घडली आहे. (Madhya Pradesh)
अधिक माहिती अशी की, दीड वर्षाच्या बाळाचे आईवडील आणि कुटुंबीय मध्य प्रदेशातील हर्डी गावात रातात. बाळ आजारी असल्याने त्यांनी त्याला गावातील बुटी बाई बायगा नावाच्या प्रसूती सेविकेकडे घेऊन गेले. तिला प्रसिद्ध प्रसूती सेवक म्हणून ओळखली जाते. तिने बालकाला 4 नोव्हेंबर रोजी लोखंडी सळईने चटके देत डागले. बाळाला झालेला न्यूमोनिया बरा होण्यासाठी हताश झालेल्या कुटुंबाने पारंपारिक उपचारपद्धतीची सेवा मागितली होती.
मात्र हा आजार बरा होण्यासाठी केलेलं कृत्य त्यांना महागात पडलं. बाळाची प्रकृती अधिकच बिघडल्याने पुन्हा त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत मुलाच्या मानेवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर 40 हून अधिक चटके आढळून आले. क्रूर आणि अपरंपरागत उपचारामुळे बाळाला गंभीर दुखापत झाली, असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.(Pneumonia Treatment)
दरम्यान, या प्रकरणात बुटीबाई बेगा, मुलाची आई बेटलवती बेगा आणि आजोबा रजनी बेगा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मादक पदार्थ आणि चुकीचे उपचार कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Madhya Pradesh Crime )