नवी दिल्ली : थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने थायलंडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक बसला आग लागून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये पथुम थानी प्रांतात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही आगीची घटना घडली
नेमकं काय घडलं?
थायलंडची राजधानी बँकॉक येथून मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने अयुत्थाया येथे सहलीला निघाले होते. यावेळी या बसला अचानक आग लागली. या घटनेत २५ विद्यार्थ्यांसहित शिक्षक होरपळले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून काही विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
दरम्यान, या बसमध्ये एकूण ४४ प्रवाशी प्रवास करत होते. बसमधून १९ जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर बाकीचे लोक या बसमध्ये अडकले आहेत. त्यामुळे बसमधील उर्वरित लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत नेमके किती जणांचा मृत्यू झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या बसमधील एकूण वाचलेल्या विद्यार्थ्यांवरून २५ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
เวลาประมาณ 12:27 น.
ไฟไหม้รถบัสนักเรียน
หน้าอนุสรณ์สถาน
ฝั่งถนนวิภาวดีรังสิตเบื้องต้น…มีผู้เสียชีวิต.!
และบาดเจ็บจำนวนมาก
กรุงเทพมหานคร#โหนกระแส #ไฟไหม้. pic.twitter.com/mflYJjJ2iX— ตะละแม่บุษบง (@MY_1428_V2) October 1, 2024