Kanchenjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (दि,17) रेल्वे अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. ही धडक इतकी जोरात होती की, कांचनजंगा एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured
Details awaited. pic.twitter.com/8rPyHxccN0
— ANI (@ANI) June 17, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपाणी स्टेशनजवळ हा अपघात झाला.
यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. सीमांचलमध्ये झालेल्या अपघातात रेल्वेचे अनेक डबे रुळावरुन घसरले आहेत. कांचनजंगा एक्सप्रेस सियालदाहला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कांचनजंगा एक्सप्रेसच्या तीन डब्याचे मोठं नुकसान झाले आहे. रेल्वेसेवा यामुळे विस्कळीत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वेच्या अधिका-यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Shocked to learn, just now, about a tragic train accident, in Phansidewa area of Darjeeling district. While details are awaited, Kanchenjunga Express has reportedly been hit by a goods train. DM, SP, doctors, ambulances and disaster teams have been rushed to the site for rescue,…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 17, 2024
या अपघातात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातानंतर ट्विट केले आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात आत्ताच झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला. अद्याप माहितीची प्रतीक्षा आहे. कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आणि आपत्ती पथक मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.