दिल्ली : शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार भागात शनिवारी रात्री 11.32 च्या सुमारास एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली. आगीतून 12 मुलांची सुटका करण्यात आली. या आगीत वाचवण्यात आलेल्या 12 नवजात मुलांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला.
बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच या इमारतीतील 11 नवजात बालकांची या टीमने सुटका केली आहे, तर अनेक बालकांना भाजल्याने जखमा झाल्या आहेत. तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या इतर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
#WATCH | Delhi: A massive fire broke out at a New Born Baby Care Hospital in Vivek Vihar
As per a Fire Officer, Fire was extinguished completely, 11-12 people were rescued and taken to hospital and further details are awaited.
(Video source – Fire Department) https://t.co/lHzou6KkHH pic.twitter.com/pE95ffjm9p
— ANI (@ANI) May 25, 2024
काही वेळातच आगीने वरच्या मजल्याला वेढले, पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या लोकांनी इमारतीच्या मागील बाजूच्या खिडक्या तोडल्या आणि नवजात बालकांना एक एक करून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे सहा नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
यादरम्यान, इमारतीबाहेर उभी असलेली एक व्हॅनही पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी गोंधळ सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली आहे.