Patana Boat Capsizes : बिहारची राजधानी पाटणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गंगास्नान करण्यासाठी १७ भाविक घेऊन जाणारी बोट गंगा नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ११ जणांचे प्राण वाचले आहेत. मात्र, ४ जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरु असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगा दसऱ्याच्या निमित्ताने बिहारच्या गंगा घाटावर गंगा स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक याठाकिणी येत असतात. यावर्षीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना गंगास्नान करण्यासाठी घेऊन जाणारी बोट नदीमध्ये बुडाली. या बोटीतून १७ जण प्रवास करत होते.
यामधील १७ जणांपैकी काही जण पोहत नदीच्या काठावर आले, तर काही जणांचे प्राण वाचवण्यात स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमला यश आले. १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर ४ जण बेपत्ता आहेत.त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. हे चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर रेस्क्यू टीम आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. पोलीस एसडीआरएफ टीमच्या मदतीने गंगा नदीत सर्च ऑपरेशन करत आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा दसऱ्यानिमित्त बरेच जण रविवारी उमानाथ घाटावर गंगेत स्नान करण्यासाठी आले होते. गंगा स्नान करण्यासाठी बोटीतून जात असताना अचानक बोटीचे संतुलन बिघडल्याने बोट नदीच्या मध्यभागी पलटी झाली. बोटीतून प्रवास करणाऱ्या काही जणांनी पोहत आपला जीव वाचवला. तर ज्यांना पोहता येत नव्हते ते बेपत्ता झाले आहेत. अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.
या घटनेत एकाच कुटुंबातील १७ जण नदीत बुडाले. यातील १३ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. एसडीआरएफचे पथक ६ जणांचा शोध घेत होती. यामधील दोघांना वाचवण्यात यश आले. तर चौघांचा शोध सुरू आहे. एनएचएआयचे निवृत्त अधिकारी अवधेश प्रसादही बेपत्ता आहेत. अवधेश प्रसाद महिनाभरापूर्वीच निवृत्त झाले. तर त्याची पत्नी बचावली आहे.