मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार असा प्रश्न सर्वच साहित्य प्रेमींना पडला होता, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून यंदाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्लीत होणार आहे.
आज मुंबईत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, तब्बल सात दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. याचे आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येणार आहे. सरहद ने मध्ये पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते.
दरम्यान, 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर औंध आणि अमळनेर या दोन ठिकाणांचा पर्यायही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे होता मात्र ही दोन्ही ठिकाणे लहान असल्याने या ठिकाणांना नापसंत देण्यात आली.
त्यानंतर नवी दिल्ली, मुंबई, इचलकरंजी या तीन पर्याय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे होते. त्यानंतर आता नवी दिल्लीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाणावरील भागात हे साहित्य संमेलन पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.