टोकियो : जपानच्या क्युशू प्रदेशातील मियाझाकी प्रीफेक्चरच्या किनारपट्टीवर गुरुवारी संध्याकाळी 7.1 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक वेळेनुसार सुमारे 4:43 वाजता झालेल्या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागात तातडीने स्थलांतर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
क्युशूच्या दक्षिणेकडील जपानी बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले असता रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी बाधित भागातील लोकांना उच्च जमिनीवर जाण्याचे आणि पुढील अद्यतनांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन करत असल्याची माहिती मिळत आहे.
सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना
जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा उसळण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्सुनामीग्रस्त भागात बचाव पथकही पोहोचले आहे.
आपत्कालीन सेवा हाय अलर्टवर
आपत्कालीन सेवा हाय अलर्टवर असून स्थानिक अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. त्सुनामीच्या संभाव्यतेमुळे किनारपट्टीवर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची भीती वाढली आहे.