Hajj Pilgrims : सौदी अरेबियात हजला गेलेल्या 550 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत हज यात्रेकरुंमध्ये सर्वाधिक 323 इजिप्तमधील यात्रेकरुंचा समावेश आहे. जॉर्डनमधील सुमारे 60 हज यात्रेकरुंचा देखील मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील उष्मा प्राणघातक आहे. मात्र यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, अति उष्णतेमुळे हे मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि.18) सौदी सरकारने सांगितले आहे.
🚨 Unusual occurrence:
At least 550 pilgrims have died in recent days while performing Hajj in Saudi Arabia, most due to heatstroke.
-Agence France-Presse.#Hajj #SaudiArabia #Pilgrims #Heatstroke #AFP pic.twitter.com/XlwvsKcOoM
— SilencedSirs◼️ (@SilentlySirs) June 18, 2024
सौदी अरेबियामध्ये खूप उष्मा आहे. यंदा 14 जूनपासून हज सुरू झाला असून 19 जूनपर्यंत चालणार आहे. हजसाठी जगभरातून लाखो मुस्लिम सौदी अरेबियातील पवित्र शहर मक्का येथे पोहोचले आहेत. इस्लाममध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम मुस्लिमांना हज करणे अनिवार्य आहे.
मक्का येथील पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी सौदी अरेबिया दरवर्षी मोठी व्यवस्था करते, मात्र प्रचंड गर्दी आणि कडक उन्हामुळे हाजी आणि पोलीस अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, गेल्या वर्षी सुमारे 20 लाख मुस्लिम हजसाठी सौदी अरेबियात पोहोचले होते. या कालावधीत 240 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियातील होते.