Israel and Hamas War : नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धला दिड महिना उलटून गेला आहे. जवळपास महिन्याभरापासून रोज गाझा पट्टी आणि इस्रायल शेकडो मृतदेह पडतायतं. आता काल इस्रायलने शनिवारी रात्रीही गाझा पट्टीवर हवाई हल्ला चढवला. सेंट्रल गाझामधील माघाझी निर्वासितांच्या छावणीमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केल्याने जवळपास ५१ पॅलेस्टाईन कींबहूना त्यापेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने शनिवारी संपूर्ण रात्र गाझावर बॉम्बफेक चालूच ठेवली होती आणि गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात हल्ले तीव्र केले. या हल्ल्यांमध्ये अनेक निवासी घरेही उद्ध्वस्त झाली. मृतांची आकडेवारी पाहिली तर एकूण संख्या ९ हजार ४८८ झाली आहे. मृतांमध्ये ३ हजार ९०० मुले असून १५०९ महिलांचा समावेश आहे. गाझा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २४ हजारांहून हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर वेस्ट बँक प्रदेशात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात किमान १४० जण ठार झाले आहेत.
बेंजामिन नेतन्याहूकडून युद्धविराम अशक्य
युद्धात नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि गाझामध्ये आणखी मदतसामग्री येऊ देण्यासाठी ‘मानवीय युद्धविरामकरण्याकरता अमेरिकेचा इस्रायलवर दबाव सुरू आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना तो मान्य नाही. हमासने ओलीस ठेवलेल्या सुमारे २४० लोकांची सुटका केल्याशिवाय तात्पुरता युद्धविराम होणार नाही, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
६० हून अधिक ओलीस बेपत्ता
गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे ६० हून अधिक ओलीस बेपत्ता असल्याची माहिती हमासने दिली आहे. तर, याबाबत इझ अल-दीन अल-कासम ब्रिगेड्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, गाझा विरुद्धच्या सततच्या क्रूर आक्रमणामुळे आम्ही ओलिसांपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही.