शिमला: हिमाचल प्रदेशातील चंबा, हमीरपूर, कुल्लू आणि आसपासच्या भागात दोनदा भूकंपाचे हलके धक्के जाणवले. तसेच काही भागात जोरदार धक्के जाणवले. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याची पुष्टी केली असून रिॲक्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.3 असल्याचे सांगितले आहे. लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, हे धक्के रात्री 9.33 आणि नंतर 9.36 वाजता जाणवले. चंदिगडमध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले.
हिमाचलमध्ये सतत भूकंप होत असतात. हिमाचलमधील शिमला, मंडी आणि चंबा हे भूकंप संवेदनशील झोन 4 आणि 5 मध्ये येतात. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक भूकंप चंबा येथे होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 120 वर्षांपूर्वी याच दिवशी 1905 मध्ये 4 एप्रिलला हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात विनाशकारी भूकंप झाला होता.