अमरेली : गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील पदरसिंगा गावातील संजय पोर्ला या शेतकऱ्याने त्याच्याकडील जुन्या व त्याच्या दृष्टीने त्याच्या भाग्योदयाचे निमित्त ठरलेल्या कारचा रीतसर अंत्यविधी केला. अनेकांनी संजय यांना ही कार भंगारमध्ये विकण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी २०१४ मध्ये ही सेकंड हँड कार खरेदी केली होती.
कार खरेदीनंतर संजय यांची आर्थिक स्थिती दिवसागणिक सुधारत गेली. त्यामुळे या कारचा दफनविधी त्यांनी केला. १५०० लोकांना जेवण दिले. मंत्रोच्चारात कारचे दफन करण्यात आले. कार्यक्रमावर त्यांनी तब्बल चार लाख रुपये खर्च केले.
कारचे मालक काय म्हणाले?
कारचे मालक संजय पोलारा सुरतमध्ये बांधकाम व्यवसाय करतात. कुटुंबासाठी भाग्यवान ठरलेली कार भावी पिढ्यांना आठवावी, यासाठी काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा होती. ‘मी ही कार १५ वर्षांपूर्वी खरेदी केली होती आणि तिच्या येण्याने कुटुंबात भरभराट झाली. व्यवसायात यश मिळण्याबरोबरच माझ्या कुटुंबाला मान-सन्मानही मिळाला.
ही कार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरली आहे. त्यामुळे ती विकण्याऐवजी त्याच्या आठवणी कायम जपण्यासाठी मी तिला माझ्या शेतात पुरले आहे. या समारंभासाठी एकूण चार लाख रुपये खर्च आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
Gujarat: In Amreli, farmer Sanjay Polra gave his 15-year-old car a symbolic “final resting place” in gratitude for the prosperity it brought his family. The family held a ceremony with the village, planting trees at the site to commemorate their fortune-changing vehicle pic.twitter.com/vtoEkVQLIP
— IANS (@ians_india) November 8, 2024