Uttarakhand Violence : उत्तरखंड : उत्तरखंडमधील हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. आतापर्यंत तिथे 4 नागरिक ठार झाले असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. त्याशिवाय कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. हल्दवानी येथील बेकायदेशीर मशीद तसेच मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलिसांवर मुस्लिम समाजाच्या जमावाने हल्ला केला. परिणामी परिस्थीती चिघळली आहे. मोठ्या प्रमाणत तिथे जाळपोळ झाली.
पोलीसप्रशासन सतर्क
तिथल्या सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, जमावाला पांगविण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समाजकंटक दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आल्याचे समजते. देहरादून, हरिद्वार आणि उधम सिंह नगर जिल्ह्यात पोलीस पूर्ण सतर्क आहेत. संवेदनशील भागांवर पोलिसांची सतत नजर असते. उधमसिंगनगर एसपींनीही संपूर्ण जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांची नजर असून सर्वसामान्यांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कर्फ्यू लागू, इंटरनेट सेवाही बंद
नैनीताल जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी हिंसाचार घडल्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशानुसार, हल्द्वानी परिसरात तत्काळ कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व शाळा शुक्रवारी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय काल (शनिवार, 8 फेब्रुवारी) रात्री नऊ वाजेपासून परिसरातील इंटरनेटसेवाही खंडीत करण्यात आली आहे.
पोलिसांवर दगडफेक
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही इमारती पाडण्यास सुरुवात होताच महिलांसह संतप्त रहिवाशांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून कारवाईचा निषेध केला. ते बॅरिकेड्स तोडताना आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी झटापट करताना दिसले. हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांना बनभूलपूरा परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये पालिका कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. जे मदरशावर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर इमारतींच्या छतावरुन आणि अरुंद गल्ल्यांमधून दगडफेक करण्यात आली. ज्यामुळे शेकडो नागरिक जखमी झाले.
हिंसाचार कसा पसरला?
उत्तराखंड हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात मलिकच्या बागेत ‘बेकायदेशीर मदरसा आणि नमाजची जागा होती. महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी सांगितले की, या जागेजवळ तीन एकर जागा होती, जी यापूर्वीच महापालिकेने ताब्यात घेतली होती. यानंतर अवैध मदरसा आणि नमाजचे ठिकाण सील करण्यात आले. गुरुवारी जेसीबीच्या सहाय्याने अवैध मदरसा व नमाजचे ठिकाण पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदरसा पाडताच हिंसाचार सुरू झाला.