हरियाणा : हरियाणातील नूह येथील पिगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीवर केवळ बलात्कारच केला नाही तर तिचे पाय देखील तोडले आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली. हत्या केलेले ठिकाण मुलीच्या रक्ताने माखले होते. सुमारे ७ तासांच्या शोधानंतर मुलीचा मृतदेह बाहेर काढता आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी घराच्या अंगणात खेळत होती. दुपारी चारच्या सुमारास गावातील एका तरुणाने त्यांच्या मुलीला फूस लावून सोबत नेले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. काही सुगावा लागला नाही.
सुमारे ७ तासांनंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह डोंगरावर आढळून आला. मृतदेह पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. डोंगरावरही रक्ताच्या थारोळ्या आढळल्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबीय मुलीचा शोध घेत असताना आरोपीही त्यांच्यासोबत मुलीचा शोध घेत होता. बऱ्याच वेळानंतर मुलीचा मृतदेह डोंगरमाथ्यावरील झुडपात आढळून आला असता, सायंकाळी उशिरा ही मुलगी गावातील हरिश्चंद्रजवळ खेळत होती असे कळले. तीला गावातील काही मुलांनी आरोपीसोबत पाहिले होते. यानतंर आरोपीचा शोघ घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपीचा सुगावा लागताच त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.