छत्तीसगड : छत्तीसगडच्या विलासपूरमध्ये एक बुचकळ्यात टाकणारी घटना समोर आली आहे. त्याचे झाले असे की, पती-पत्नीच्या भांडणात रेल्वे बंद असलेल्या मार्गावर गेली आणि रेल्वेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे पतीला नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. आता यामुळे पतीने हायकोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रकरण रंजक आहे तितकेच नुकसान करणारे आहे.
नेमकं काय घडलं?
स्टेशन मास्तर म्हणून उघुटी असणाऱ्या पतीला पत्नीचा फोन आला आणि त्यांच्यात भांडण सुरू झाले. त्याच्या एका हातात मोबाईल, तर दुसऱ्या हातात ऑफिसचा फोन होता. एकाचवेळी तो दोन्ही फोनवर बोलत होता. पायेळी स्टेशन मास्तरच्या पत्नीने ऑफिसमधून घरी या मग बोलू, त्यावर पतीने ओके म्हटले. ओके ऐकल्यानंतर ऑफिसच्या स्टेशन मास्तरने रेल्वेला सिग्नल दिला; पण घडले भलतेच; गाडी बंद असलेल्या मार्गावर गेली आणि रेल्वेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. फोनवरून पत्नीशी भांडणाऱ्या स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले.
खरेतर पत्नीचे दुसऱ्या एकाशी अनैतिक संबंध होते. वारंवार समजावून सांगूनही ती महिला आपल्या प्रियकरासी फोनवर नेहमीच बोलायची. इतकेच नाही तर पतीसमोरच प्रियकराशी बोलू लागली. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे होऊ लागली होती.
दरम्यान, पत्नीकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत पतीने हायकोर्टात धाव घेतली, पत्नीने फोनवरून भांडण केले आणि अशात रेल्वेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पतीला निलंबित व्हावे लागले. महिलेने कुटुंबाच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. पत्नी आपल्या पतीशी क्रूरपणे वागली. त्यामुळे पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज हायकोटने मंजूर केला आहे.