अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : यापेक्षा भयंकर दुर्दैव दुसरे काय असावे, अत्यंत कठोर परिश्रम करत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी, त्यात आय पि एस पोस्ट मिळावी, ट्रेनिंग पूर्ण होत यावे आणि आनंदाच्या भरात नव्या नोकरीवर रुजू व्हायला प्रवास सुर करावा आणि नियतीने डाव साधावा… अशीच एक हृदयद्रावक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मोठे यश मिळावे आणि त्या यशाचा अनुभव दुर्दैवामुळे काहीजणांना घेता येत नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मध्यप्रदेशातील एक तरुण २६ व्या वर्षी IPS झाला. नोकरीवर रुजू होणार त्याचवेळी अपघातात त्याचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात रविवारी एका भीषण अपघातात २६ वर्षीय IPS अधिकारी यांचा मृत्यू झाला. पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होत असताना त्यांचा अपघात झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत अधिकारी हर्ष बर्धन यांचे मूळ गाव मध्य प्रदेशातील असून ते २०२३ बॅचचे कर्नाटक कॅडरचे IPS अधिकारी होते.
रविवारी संध्याकाळी हसन तालुक्यातील कित्ताणे गावाजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला आहे. टायर फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला आणि झाडाला धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली. हर्षवर्धन हसनकडे होलेनरसिपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी जात होते. त्या प्रवासादरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला आहे.