तामिळनाडू : राज्यातील कल्लाकुरिची जिल्ह्यात बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक जणांना उपचारासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे. यावेळी तपास केला असता त्यात घातक मेथनॉल असल्याचे समजले.
Tamil Nadu: At least 25 people died and several were hospitalised after reportedly consuming illicit liquor in Tamil Nadu’s Kallakurichi district: District Collector MS Prasanth https://t.co/4SHyj9AcvE
— ANI (@ANI) June 19, 2024
कल्लाकुरिची शहरातील हद्दीत करुणापुरम हा भाग आहे. येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने दारु विकत घेतली. त्यानंतर विषारी दारुच्या बाधेने अनेकांना प्राण गमवावे लागले. तर यावेळी कल्लाकुरिचीचे जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी जिल्ह्याच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.
#WATCH | Tamil Nadu: At least 25 people died and several hospitalised after reportedly consuming illicit liquor in Kallakurichi district.
Latest visuals from Kallakurichi Government Medical College pic.twitter.com/7NTzv3NclS
— ANI (@ANI) June 20, 2024
या घटनेची दखल मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घेतली. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर आणि ही घटना रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. अशा गुन्ह्यांमध्ये सामील गु्न्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.