बंगळुरु: बंगळुरुमधील कोरमंगला येथील वसतिगृहात बिहारमधील 24 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला शनिवारी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. अभिषेक असे आरोपीचे नाव असून त्याने 23 जुलैच्या रात्री कृती कुमारीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तो मध्य प्रदेशात पळून गेला होता.
हत्येमागील कारण शोधण्यासाठी आरोपींची बेंगळुरू येथे चौकशी करण्यात येणार आहे. एका खासगी कंपनीत काम करणारी २४ वर्षीय तरुणी हल्लेखोराच्या मैत्रिणीची सहकारी होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी मंगळवारी रात्री 11.30 वाजता व्हीआर लेआउटमध्ये असलेल्या पीजी हॉस्टेलमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या खोलीत चाकूने कृतीचा गळा चिरला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. दक्षिण पूर्व पोलिस उपायुक्त कार्यालय आणि कोरमंगला पोलिस स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंकटरेड्डी लेआउटमधील भार्गवी स्टेइंग होम्स फॉर लेडीजमध्ये ही घटना घडली. ही महिला हल्लेखोराच्या मैत्रिणीची सहकारी होती.
मारेकरी ओळखीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनीही या घटनेसाठी पीजी होस्टेल मालकाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी मूळची बिहारचीआहे. कृती कुमारी असे तिचे नाव आहे. ती बंगळुरुमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होती.
सीसीटीव्ही फुटेजही आले समोर
अभिषेक बॅग घेऊन पीजी हॉस्टेलमध्ये शिरल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. कृतीने काही वेळाने दार उघडल्यावर तो तिला तिच्या केसांना धरून बाहेर काढतो आणि तिच्यावर चाकूने अंदाधुंद हल्ला करू लागतो. यादरम्यान, पीडितेने हल्ल्याचा प्रतिकार केला, परंतु मारेकऱ्याने तिच्यावर हल्ला सुरूच ठेवला आणि शेवटी मुलीचा गळा चिरला. मोठा आवाज ऐकून वसतिगृहात उपस्थित असलेल्या इतर मुली घटनास्थळी आल्या, पण त्यांनी कृतीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पीडित कृती काही वेळ मदत मागताना दिसली, पण एकही मुलगी तिच्या मदतीसाठी पुढे आली नाही.
Great work by Bengaluru Police… Accused in ladies PG murder case arrested from Madhya Pradesh by Bengaluru Police … @CPBlr @DCPSEBCP … pic.twitter.com/DGgD6b3HUK
— Yasir Mushtaq (@path2shah) July 27, 2024