नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत यावेळी २४ मुस्लिम उमेदवारांनी विजय मिळवला. यात तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बहरामपूरमधून विजय मिळविणाऱ्या माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि आसामच्या धुबरीत बाजी मारणाऱ्या काँग्रेसच्या रकीबूल हुसेन यांचा समावेश आहे. पण मागच्या वेळेसच्या तुलनेत यावेळी मुस्लिम उमेदवारांची संख्या दोनने कमी झाली आहे. गत निवडणुकीत २६ उमेदवार विजयी झाले होते. तर २०१४ साली २३ मुस्लिम उमेदवारांनी संसदेत पाऊल टाकले होते. यंदा ७८ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.