नवी दिल्ली : अंतराळाचे जग अनेक प्रकारच्या रहस्यांनी भरलेले आहे. कधी एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याने धोका निर्माण होतो, तर कधी शास्त्रज्ञांना नवीन तारा दिसतो. यावेळी, खगोलशास्त्रज्ञांनी एक महाकाय उल्का संदर्भात अलर्ट जारी केला आहे की, ती पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.
ही उल्का नासासाठी 20 वर्षांपासून चिंतेचे कारण बनली आहे. कारण, ती पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. 2004 मध्ये याचा शोध लागला, तेव्हापासून ते पृथ्वीसाठी धोकादायक मानले जात होते. त्याचा सरासरी आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगइतका आहे. त्याचा आकार 450×170 मीटर आहे आणि त्याने फक्त पृथ्वीला स्पर्श जरी केला त्यातून होणारा स्फोट पृथ्वीवर पडणाऱ्या शंभर अणुबॉम्बच्या बरोबरीचा असणार आहे. प्लॅनेटरी सोसायटीच्या मते, त्याचा परिणाम शेकडो अणुबॉम्बच्या स्फोटासारखा असेल.
या लघुग्रहाला ‘गॉड ऑफ कॅओस’ म्हटलं जात आहे आणि तो 13 नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या उल्केला स्पेस रॉक 99942 अपोफिस असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो पृथ्वीच्या 19 हजार मैलांच्या जवळ जाईल. लघुग्रह शास्त्रज्ञ रोनाल्ड-लुईस बॅलॉझ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने सांगितले की, अपोफिस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून गेल्यास खगोलकंपाची शक्यता वाढेल. यामुळे पृष्ठभागावर तीव्र कंपन निर्माण होईल.
20 वर्षांपासून चिंतेचे कारण…
ही उल्का नासासाठी 20 वर्षांपासून चिंतेचे कारण बनली आहे. कारण ती पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. 2004 मध्ये याचा शोध लागला, तेव्हापासून ते पृथ्वीसाठी धोकादायक मानले जात होते. मात्र नासाच्या निअर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज सेंटरच्या म्हणण्यानुसार, पुढील किमान 100 वर्षांत ही उल्का पृथ्वीवर धडकणार नाही. ही दिलासा देणारी बाब आहे.