वाराणसी: वाराणसीतील एका धक्कादायक घटनेत, एका १९ वर्षीय मुलीने वाराणसीमध्ये ७ दिवसांच्या कालावधीत २३ पुरूषांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. २९ मार्च रोजी मुलगी बेपत्ता झाली आणि ४ एप्रिल रोजी घरी परतली, नंतर तिने सहन केलेल्या भयानक त्रासाची माहिती घरच्यांना दिली. तिच्या जबाबानुसार, तिचे अपहरण करण्यात आले आणि कॅफे, हॉटेल आणि गोदामांसह विविध ठिकाणी अनेक पुरूषांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि ६ आरोपींना अटक केली आहे. मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे की, २९ मार्च रोजी त्यांच्या मुलीला एका आरोपीने आमिष दाखवून नेले आणि त्यानंतर अनेक पुरूषांनी तिच्यावर बलात्कार केला. 23 पुरुषांनी तिला अनेक वेळा बंदिस्त करून ठेवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तरुणीने जबाबात सांगितले आहे.
घटनाक्रमाची कालक्रमानुसार मुलीच्या जबाबानुसार, तिच्यावर वेगवेगळ्या पुरूषांनी अनेक वेळा केला बलात्कार, जाणून घ्या या संपूर्ण घटनेची माहिती
– २९ मार्च: एका आरोपी मित्राने तिला एका कॅफेमध्ये नेले, जिथे तिच्यावर रात्रभर बलात्कार केला.
-३० मार्च: दुसऱ्या आरोपीने आणि त्याच्या मित्राने महामार्गावर तिच्यावर बलात्कार केला.
-३१ मार्च: तिला एका कॅफेमध्ये नेण्यात आले, जिथे तिला मादक पदार्थ पाजले आणि 5 पुरूषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
-१ एप्रिल: तिला एका हॉटेलमध्ये नेण्यात आले, जिथे तिला एका क्लायंटला मसाज करण्यास भाग पाडले आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला, हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर आणखी एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला.
एका आरोपीने आणि त्याच्या दोन मित्रांनी तिला औरंगाबादमधील एका गोदामात नेले, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला एका खोलीत घेऊन गेला जिथे इतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. ती पळून जाण्यात यशस्वी झाली आणि सिग्रा येथील एका मॉलसमोर बसली असता.
-२ एप्रिल: एका पुरूषाने आणि त्याच्या मित्राने तिला नशायुक्त नूडल्स दिले आणि तिच्यावर बलात्कार केला.
-३ एप्रिल: दानिश नावाच्या पुरूषाने आणि त्याच्या आणखी दोन मित्राने गुंगीचे औषध देऊन एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि पोलिस पुरावे गोळा करण्याचे आणि उर्वरित आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या घटनेमुळे समाजात व्यापक संताप आणि चिंता निर्माण झाली आहे, अनेकांनी पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, ते पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरणाची कसून चौकशी करतील आणि पिडीतेला न्याय मिळवून देतील. दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरु झाली असल्याचे, छावणीचे सहाय्यक आयुक्त विदुश सक्सेना यांनी सांगितले. इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत आहे.