क्वालालंपूर : मलेशियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे नौदलाचे दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले आणि अपघात झाला. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन्ही हेलिकॉप्टर लष्कराचे आहेत. मलेशियातील लुमुट येथे ही घटना घडली आहे. त्यात एकूण दहा क्रू मेंबर्स होते, प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एकही जणाचे प्राण वाचले नाहीत.
मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाची तालीम सुरू असताना ही घटना घडली. हे रॉयल मलेशियन नेव्ही तळावर घडले, जेथे आगामी कार्यक्रमासाठी तालीम सुरू होती. एका प्रवक्त्याने न्यू स्ट्रेट टाईम्सला सांगितले की, अग्निशमन दल सध्या पीडितांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत आहे.
At least 10 people k1lled when two military helicopters collided midair in Lumut, #Malaysia. pic.twitter.com/gR45qrwjVZ
— Arthur Morgan (@ArthurM40330824) April 23, 2024
” नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. स्थानिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या फुटेजनुसार, दोन्ही हेलिकॉप्टर जमिनीवर पडण्यापूर्वी एका हेलिकॉप्टरने दुसऱ्याचे रोटर कापले. हेलिकॉप्टरपैकी एक, HOM M503-3, ज्यामध्ये सात लोक होते, ते धावत्या ट्रॅकवर कोसळल्याचे समजते.
दुसरे हेलिकॉप्टर Fennec M502-6 जवळच्या जलतरण तलावावर कोसळले. यामध्ये तीन लोकांचा समावेश होता. राज्याच्या अग्निशमन आणि बचाव विभागाने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार 09:50 वाजता (02:10 BST) घटनेची माहिती देण्यात आली. देशाच्या नौदलाने सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येत आहे.