मुंबई : लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हटले जाते. कारण, मुंबईच्या लोकलमधून लाखो नोकरदार रोज प्रवास करत असतात. मात्र, नुकताच लोकलमधला एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहेत. धावत्या लोकलमध्ये एका युवतीने भोजपुरी गाण्यावर अश्लिल डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या डान्समुळे अनेक सहप्रवाशांना असहज वाटू लागल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना काही प्रवाशी आपला चेहरा झाकून ठेवत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर युजर्स संतप्त झाले. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच लाइक्स आणि व्यूज मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही पातळीपर्यंत जातात. सार्वजनिक ठिकाणी नको ते वर्तन करतात. आता मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक युवती मुंबई लोकलमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहेत. युवती अचानक आपल्या जागेवरुन उठते आणि सेंसेशनल डान्स करु लागेत. युवतीच्या डान्समुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांनाही लाज वाटू लागते. काही प्रवासी अस्वस्थ होऊन उठून दुसरीकडे निघून जाताना व्हिडिओत दिसत आहेत.
Now I know why railways stocks are skyrocketing pic.twitter.com/HBaExbats4
— desi mojito ???????? (@desimojito) February 23, 2024
रेल्वेकडून चौकशीचे आदेश
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर रेल्वेकडून उत्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेने एक्स हँडलवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांनी मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला चौकशीचे आदेश दिलेत. तसेच योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर इंटरनेटवर युजर्सकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत.
कठोर कारवाईची मागणी
सोशल मीडियावर युजर्स कठोर कारवाईची मागणी करत असताना अनेक जण रेल्वेच्या नेहमीच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत आहेत. काही युजर्सकडून उपहासात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, रेल्वेने आता तिकिटावर मनोजरंगन फ्री देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. तर दुसऱ्यांने लिहिलेय की, म्हणूनच रेल्वेचे शेअर एवढ्या वर जात आहेत.