मुंबई : बलात्कार, छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे. असाच एक प्रकार मुंबईतील जुहू येथे घडला आहे. यावेळी एका महिलेने आरोप करत म्हणाली की, एका तरुणाने माझ्यासमोर येऊन स्वत:ची पँट काढली आहे. संबंधित तरुणाचा चेहरा मोबाईच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने लगेच घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे महिलेने सांगितले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहे.
@MumbaiPolice Juhu, Janki Kutir Area
This man was seen misbehaving with his pants down calling out to me loudly in the middle of the street. This was at 8:55AM today.
This is the 3rd time this has happened to me in this location, from different men. (1/2) pic.twitter.com/0aDq1BupWb— viyaa (@viyaadoshi) July 21, 2024
व्हायरल होणा-या व्हिडिओमध्ये, एक तरुण शॉर्ट्स आणि बनियान घालून फूटपाथवरून धावताना दिसत आहे. तर, महिला त्याला हाक मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुहूच्या जानकी कुटीर भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल होणा-या व्हिडिओमध्ये संबंधित महिलेसोबत कोणतेही गैरवर्तन करताना दिसले नाही. परंतु, पीडित महिलेने मुंबई पोलिसांना टॅग करत अशी माहिती दिली आहे की, ‘जुहू येथील जानकी नगर येथे एका तरुणाने मला हाक मारली आणि स्वत:ची पँट काढली आहे. हा प्रकार आज सकाळी 8.55 मिनिटांनी घडला आहे. अशी घटना तिसऱ्यांदा माझ्यासोबत घडली आहे.
या परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मी विनंती करते. कारण याआधीही अनेक महिलांसोबत असाच प्रकार घडल्याचे समजले आहे. या घटनेसंदर्भात मी निर्भया पथकाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. कृपया मला मदत करा.’
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित महिलेने शेअर केलेल्या पोस्टची दखल घेतली आणि तिला सविस्तर माहिती देण्याची विनंती केली आहे. तसेच लवकरच याप्रकरणातील आरोपी किंवा महिलांसोबत अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.