मुंबई : मुंबई मध्ये एक ३२ वर्षीय व्यक्ती पोटात कात्री खुपसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. २६ फेब्रुवारी संध्याकाळी ही व्यक्ती पार्लेमध्ये एका पूलावर जखमी अवस्थेत सापडली. तेव्हा हा प्रकार उजेडात आला आहे. अनिरूद्ध नायर असं कात्री खुपसलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नायर हा विलेपार्ले येथील आंबेवाडी भागात राहतो.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, दारूच्या नशेमध्ये अस्लम बेफाम झाला होता. वाद सुरु असताना दोघामध्ये हाणामारी झाली. या वादातच त्याच्या पोटात कात्र्या खुपसल्या होत्या. अनिरूद्ध ने पोटात कात्री खुपसलेल्या अवस्थेमध्येही मित्राने त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले. दरम्यान, अस्लम हस्मी नामक व्यक्तीशी अनिरूद्धचा वाद झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अनिरूद्ध आणि हाश्मी यांच्यात वाद झाला होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कामावरून तो घरी जात असताना हाश्मीने त्याला स्कायवॉकवर गाठून त्याच्या पोटात कात्री खुपसली. पोटाला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत अनिरूद्धने मित्राला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी हश्मीला अटक केली आहे.