मुंबई: अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. यातील सर्वात मोठी केंद्र सरकारची मोफत धान्य योजना आहे. जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील) शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे बीपीएल शिधापत्रिका नसेल तर तुम्ही ते घरबसल्या बनवू शकता. ही शिधापत्रिका काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरी बसून करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या राज्याच्या सरकारी पोर्टलवर जावे लागेल. तिथे तुम्हाला रेशन कार्ड बनवण्याचा पर्याय मिळेल.
तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर तुम्ही (http://mahafood.gov.in) वर जाऊन शिधापत्रिका बनवू शकता.
– शिधापत्रिका मिळविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल किंवा पाण्याचे बिल जमा करा.
– तुमची अर्ज फी भरा. हे शुल्कही राज्यांनुसार बदलू शकते.
– फी भरल्यानंतर, भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
– आता तुमच्या पात्रतेची छाननी केली जाईल. मग तुम्हाला शिधापत्रिका मिळेल.