मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील सांताक्रुझ पोलिसांनी योगेश सावंत नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आणि जीवेमारण्याच्या धमकी प्रकरणी अटक केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. दरम्यान, कोर्टाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
योगेश सावंत हा माझा कार्यकर्ता : रोहित पवार
दरम्यान, योगेश सावंत हा शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे. रोहित पवारांनी आपण त्याची भेट घेणार असल्याचं सांगत योगेशची पाठराखण केली आहे. होय, योगेश सावंत हा माझा कार्यकर्ता असून त्याची चूक काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. तसेच उगाच भाजपानं नाटके करू नये. तो कार्यकर्ता आहे.
त्याने काय चूक केली? एका युट्यूब चॅनेलने सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ती त्याने त्याच्या सोशल मीडियावर टाकली. आता तुम्ही त्या युट्यूब चॅनेलवर कारवाई करत नाही. ज्याने मुलाखत घेतली त्याच्यावर काही करत नाही. मात्र या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
#UPDATE | Mumbai’s Santa Cruz Police Station arrested the accused Yogesh Sawant for using derogatory language against Maharashtra Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis and threatening to kill him. He was presented before the court and the court sent him to… https://t.co/YkUwO9sAiE
— ANI (@ANI) February 29, 2024