मुंबई : कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आता मुंबईतही महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर पेशंट्सच्या नातेवाईकांनी हल्ला केला. यावेळी महिला डॉक्टर स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाली. रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणात बीएमसी एमएआरडी असोसिएशनच्या डॉक्टरांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावेळी महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. महिला डॉक्टर ड्युटीवर असताना हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण मद्याच्या अमलाखाली रुग्णालयात आला होता. त्यासोबत 7-8 जण त्यांचे नातेवाईक होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. महिला डॉक्टर रुग्णाच्या जखमा पुसत होती. त्यावेळी रुग्णाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
#WATCH | Maharahstra: On the alleged attack on a female resident doctor of Mumbai’s Sion Hospital, Dr Akshya More, General Secretary of Sion-MARD and BMC-MARD, says, “… The patient arrived in casualty after midnight in an intoxicated state with 7-8 relatives. He was involved in… pic.twitter.com/CH4tSMoic6
— ANI (@ANI) August 18, 2024
यावेळी नातेवाईकांनी रुग्णाला समजावण्याऐवजी डॉक्टरलाच शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केली. डॉ. अक्षय मोरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.