मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून २१ डिसेंबरपर्यंत नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. एका आठवड्याचे हे अधिवेशन असून यावेळी सभागृहाचे नियमित कामकाज चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानभवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यादरम्यान अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.