मुंबई : राज्यात सद्य विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचारालाही सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीसोबतच महायुतीचे नेते सुद्धा जोरदार तयारीला लागले आहेत. अशातचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील सभेतून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली आहे. पहिल्याच जाहीर प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीला चांगलंच धारेवर धरलं आहे.
‘तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं चालेल का?’ असा सवाल एकनाथ शिंदे यांनी जनतेला केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांची पहिली जाहीर सभा ही कुर्ला येथे होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुर्ला येथील सभेपासून प्रचार सभेचा नारळ फोडला आहे. कुर्ला येथे त्यांनी जनतेला हिंदी भाषेत संबोधित केलं.