मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विमानतळावरून सापांची तस्करी होत असल्याची माहिती समोर येत आहे. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून अकरा परदेशी प्रजातीचे साप जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे बिस्किट आणि केकच्या पाकिटातून या सापांची तस्करी करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली असून नऊ ball pythons प्रजातीचे तर दोन corn snakes आणि pantherophis guttatus प्रजातीचे हे साप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परदेशी जातीचे साप असल्याने त्यांना तात्काळ बँककॉकला परत पाठवले जाणार आहे.
दरम्यान, मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी २० डिसेंबर रोजी बँकॉकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आलेल्या एका व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेतल आहे. या व्यक्तीच्या चेक-इन(Chek-In) सामानाची तपासणी केली असता यामध्ये परदेशी प्रजातीचे साप आढळून आले. विशेष म्हणजे हे साप बिस्किट आणि केकच्या पाकिटातून तस्करी करण्यात आली आहे.
विमानातून थेट सापांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच प्रवाशी आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परदेशातून आणलेल्या या सापांची भारतात मोठी किंमत आहे. परदेशात 40$ ते 50$ मध्ये हे साप विकले जातात.आत्तापर्यंत तस्करीच्या अनेक घटना घडल्या असून विविध अमली पदार्थ, वस्तू यांसह आता प्राण्यांची तस्कारी केली जात आहे. मात्र आतापर्यंत सापांची अशा पद्धतीने तस्कीरी होणे ही पहिलिच घटना घडली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करत याबाबत अधिक तपास करत असल्याचं सांगितल आहे.