मुंबई : नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज केले जातात. या वेब सीरिजने घरबसल्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. महत्त्वाचे विषय हाताळले गेले. त्यातील १० महत्तवाचे आणि जास्त रेटींग मिळालेले वेबसीरिजची लीस्ट आज आपण पाहूयात.
द रेल्वे मेन
2023 च्या टॉप वेबसीरिजमध्ये स्थान मिळवणारी द रेल्वे मेन ही वेबसीरिज सरत्या वर्षात भेटीला आली. आणि अल्पवधीतच लोकप्रिय झाली. 1984 सालच्या भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर ही मालिका अत्यंत निर्भिडपणे भाष्य करते. सत्य घटनेवर आधारित असलेली ही सीरिज अभ्यासपूर्ण मांडणीमुळे तितकीच खरी वाटते. म्हणून 8.5 रेटिंग असलेल्या या वेबसीरिजला अजूनही प्रेक्षकांची पसंती मिळतेय.
फर्जी
अभिनेता शाहिद कपूरनं फर्जी या वेबसीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केलं. शाहिद कपूर आणि विजय सेतुपथी यांची दमदार भूमाकी यातून पहायला मिळाली. एक मूळचा चित्रकार आपल्या कलेचा वापर करून या बनावट नोटांच्या धंद्यात कसा उतरतो आणि कसा चालवतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.. फॅमिली मॅनसारख्या सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीजचे दिग्दर्शक राज अॅण्ड डीके यांनी फर्जीचे दिग्दर्शन केले होते. यावेळी बनावट नोटांच्या रँकेटचा विषय त्यांनी निवडला होता. केके मेनन आणि अमोल पालेकर यासारख्या दमदार अभिनेत्यांच्या भूमिकाही तितक्याच लक्षात राहणाऱ्या आहेत.
ताली
गौरी सावंत यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारी ताली ही वेबसीरिज. विशेष म्हणजे तृतीयपंथासाठी पहिला लढा देणाऱ्या मराठमोळ्या गौरी सांवत यांचा जीवनप्रवास पडद्यावर मांडलाय मराठमोळ्या टीमनंच… आणि तो काय ताकदीचा मांडलाय हे सांगण्यासाठी IMDचे 9.3 हे रेटिंग्स पुरेसे आहेत. सुष्मीता सेन यांची यात महत्त्वाची भूमीका राहिली आहे. तालीच्या निमित्ताने दिग्दर्शक रवी जाधव आणि लेखक क्षितीज पटवर्धन यांनी याच वर्षात ओटीटीवर पदार्पण झालं.
असूर 2
असूरच्या भरघोस यशानंतर आणखी एका नव्या असूराची एण्ट्री झाली आणि याही असूराला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पहिल्या सीझनमध्ये मांडलेला सायको थ्रिलर ड्रामा प्रेक्षकांना चांगला भावला त्यामुळे दुसऱ्या सीझनकडून अर्थातच अपेक्षा वाढल्या होता. 1 जून 2023 ला ‘असूर 2’ ही वेबसीरिज भेटीला आली आणि तीन वर्षांची प्रतीक्षा संपली. आणि त्या पूर्ण करण्यात सीरिजच्या टीमला यश आलं. आठ भागांची ही सीरिज 8.5 रेटिंगसह टॉप वेबसीरिजच्या यादीत आहे.
द नाईट मॅनेजर
द नाईट मॅनेजरच्या जबरदस्त यशानंतर या सीरिजचा दुसरा भाग या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसरा सीझनही प्रचंड गाजला. खिळवून ठेवणारं कथानक, आशयाची प्रभावी मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पवधीतच ही मालिका चर्चेत आली. अनिल कपूरला नकारात्मक भूमिकेत पाहणं ही रसिकांसाठी ट्रीट आहे. या वेबसीरिजला आयएमडीबीमध्ये 7.6 रेटिंग मिळालेयत.
दहाड
देशाला हादवणाऱ्या सायनाईड मोहन या सायको किलरच्या आयुष्यावर बेतलेली दहाड ही वेबसीरिज. सायनाईड मोहनने 2003 ते 2009 या कालावधीत 20 मुलींची गर्भनिरोधक गोळी देवून हत्या केली. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आठ एपिसोडमध्ये तितक्याच ताकदीने मांडलीय. सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शर्मा, गुलशन देवय्या यांच्या सशक्त अभिनयाने सीरिजला आणखी प्रभावी केलंय. म्हणूनच आयएमडीबीमध्ये 7.6 रेटिंगसह या सीरिजने सोशल मीडियावरही वाहवाह मिळवली.
स्कूप
पत्रकार जिग्ना वोरा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या स्कूप या वेबसीरिजला प्रचंड वाहवाह मिळाली. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सीरिजला पुरस्कारही मिळाला. एका ब्रेकिंग न्यूजमुळे जिग्ना वोराच्या आयुष्यात आलेलं वादळ आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीचा तिचा संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अभिनेत्री करिष्मा तन्ना ही भूमिका सीरिजमध्ये अक्षरश: जगलीय. दिग्दर्शक हंसल मेहता यांची मच अवेटेड स्कूप ही वेबसीरिज याच वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आली.
काला पानी
ऑक्टोबर महिन्यात भेटीला आलेल्या काला पानी या वेबसीरिजमधून गोवारीकर यांनी पदार्पण केलं आणि इथेही आपल्या कसदार अभिनयाने ठसा उमटवला. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेता आशुतोष गोवारीकर यांच्या ओटीटी पदार्पणाचा मुहूर्त ठरला तो 2023मध्ये . चित्त थरारक कथा आणि दमदार अभिनय यामुळे ही वेबसीरीज ट्रेडिंगमध्ये आहे.