इंटरनेटवर सध्या एका नाचणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही कधी ढोलाच्या तालावर नाचणारा प्राणी पाहिला आहे का? नक्कीच नसेल पण, हा हत्ती ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही. मात्र, तो कधी दादा, काका, काकू गाण्यावर नाचत आहे. त्याचा नाच पाहून सगळेच भारावून गेले आहेत.
हत्तीच्या अंगावर लाल रंगाचे मखमली कापड टाकून सजवण्यात आले आहे. हत्तीच्या आजूबाजूला लोक असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही लोक ढोल ताशा वाजवत नाचत असतात. हत्तीभोवती उभे असलेले लोकही हत्तीसह नाचत आहेत. यासह हत्ती राजा ढोल ताशाच्या तालावर व्हिडीओमध्ये पाय थिरकताना दिसत आहे. उड्या मारत हत्ती नाचत आहे. जणू काही उत्सवच आहे. कधी अपेक्षा केली नसेल अशा उत्तम प्रकारे हत्ती नाटत आहे. हत्तीचा हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.
Only Sanatan Culture can keep animals happy. pic.twitter.com/5ObF0LqOsF
— Eminent Woke (@WokePandemic) February 2, 2024
@WokePandemic या हँडलने सोशल मीडिया X वर हत्तीचा हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की “केवळ सनातन संस्कृतीच प्राण्यांना आनंदी ठेवू शकते”. एका वापरकर्त्याने लिहिले,”सनातन धर्म आणि संस्कृतीचे अलौकिक आणि अद्भुत दृश्य.” एका यूजरने लिहिले, “तुम्ही असा हत्ती यापूर्वी पाहिला आहे का?” एका यूजरने लिहिले,”गणपती बाप्पा मोरया.” हा व्हिडिओ लिहिपर्यंत हा व्हिडिओ १४ लाख लोकांनी पाहिला आहे. युजर्सकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.