मुंबई: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. सहस्त्रबुद्धे हे राज्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी सहस्रबुद्धे हे सदर समितीचे अध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून ज्येष्ठ नेत्यांचे पुनर्वसन करणे सुरुच आहे.