मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची करडी नजर आहे. गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. अशातच मुंबईतील विक्रोळीमध्ये एका कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
विक्रोळीत पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी दरम्यान एक कॅश व्हॅन अडवली. त्यावेळी गाडीची तपासणी करताच त्यांना चांदीच्या विटा त्यात सापडल्या असून या साडे सहा वजनाच्या आहेत. त्या चांदीच्या विटांची किंमत आजच्या बाजारभावानुसार 60 कोटींच्या आसपास आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सातत्याने अशी रोकड सापडत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.