मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सचिव अजिंक्य नाईक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. येत्या २३ जुलैला निवडणूक पार पडणार आहे. टी ट्वेन्टी विश्वचषकादरम्यान माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले. त्यानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली आहे. अजिंक्य नाईक हे सध्या एमसीएचे सचिव आहेत. आता आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. विहंग सरनाईक हे मुंबई प्रीमियरचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील एमसीएच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.