मुंबई : राज्यातील हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता मुंबईतही हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारने मुंबईतील वर्सोवा बीचवर झोपलेल्या रिक्षा चालकासह एकाला चिरडले असून यातील रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
Maharashtra | A 36-year-old rickshaw driver, Ganesh Yadav, sleeping on Versova beach in Mumbai was crushed by an SUV car on August 12, Monday. A case of culpable homicide was registered against two people – Nikhil Jawale (age 34) and his friend Shubham Dongre (age 33). Both were…
— ANI (@ANI) August 14, 2024
गणेश यादव (वय 36) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश यादव हा ऑटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो, तर त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव हा डिलीव्हरी बॉयचं काम करतो. ते अधुनमधून वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपायला जात होते. सोमवारी (ता.12) देखील ते वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपायला गेले. तेव्हा रात्री झोपेत असताना एक भरधाव कार आली आणि त्यांना चिरडून गेली. घटनेनंतर बबलू श्रीवास्तव जागा झाला असता, त्याला शरीरावर जखमा दिसल्या. गणेश यादव हा देखील त्याच्या बाजूला झोपला होता. त्याच्या अंगावरून कार गेली. बबलुने तातडीने गणेशला रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु पोलिसांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. घटनेनंतर कारसह दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी निखिल जावळे व शुभं डोंगरे यांना अटक केली आहे. निखिल जावळे हा एका कॅब सर्व्हिसचा संचालक असून शुभम डोंगरे हा त्याच्या व्यवसायात भागीदार आहे, या दोघांना नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींना मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.