मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी ‘वंचित’ने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून 10 उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत आधीच्या यादींप्रमाणेच समाजातील सर्व जाती-जमातींना स्थान देण्यात आल आहे. तसेच या यादीतील लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील लोकसभेचे उमेदवार
रायगड – कुमुदिनी रविंद्र चव्हाण
उस्मानाबाद- भाऊसाहेब रावसाहेब अढळकर
नंदूरबार – हनुमंत कुमार मनराम सुर्यवंशी
जळगाव – प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा
दिंडोरी – गुलाब मोहन बर्डे
पालघर – विजया दहिकर म्हात्रे
भिवंडी – निलेश सांबरे
मुंबई उत्तर – बीना रामकुबेर सिंग
मुंबई उत्तर पश्चिम – संजीव कुमार अप्पाराव कलोकोरी
मुंबई दक्षिण मध्य – अब्दुल हसन खान
यातील पहिल्या यादी 8, दुसऱ्या यादीत 11, यानंतर तिसऱ्या यादीत 5 आणि चौथ्या यादीत 1 अशा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आता पाचव्या यादीत तब्बल 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.