मुंबई : मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन व्यक्तींनी एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कन्ना परीमल आणि तंबा परीमल अशी या दोन आरोपींची नावं आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० वर्षीय अल्पवयीन मुलगा घराच्या अंगणात खेळत होता. याचवेळी आरोपी कन्नाने त्याला घरातल्यांना कळू न देता घराजवळीलच एका निर्जनस्थळी घेऊन गेला होता. कन्ना परीमल आणि तंबा परीमल या दोघांनी या मुलाला निर्जनस्थळी नेल्यावर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचा केले. त्यानंतर आरोपी कन्ना याने मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार करत याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली.
मात्र घाबरलेल्या मुलाने घडलेल्या घटनेची माहिती मुलाने आपल्या कुटुंबीयांना दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. त्यावेळी मुलाचे कुटुंबीय जाब विचारायला गेले असता त्यांनाच धमकी देण्यात आली. मुलाच्या कुटुंबियांना कन्नाचा भाऊ तंबा याने पोलिसांत गेलात तर जीवे मारेल, अशी धमकी दिली. अखेर मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास मालाड पोलीस करत आहे.