Mumbai Crime News : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी वेश्या व्यवसायासाठी एका अल्पवयीन मुलींच शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी दुर्गा सिंग (३४) नावाच्या महिला दलाल आणि हॉटेल व्यवस्थापक मोहम्मद नावेद (२४) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिंग हा अल्पवयीन मुलींची विक्री करायचा, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील सिल्व्हर क्लाऊड हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचे रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 10 ला मिळाली. या माहितीनुसार, पोलिसांनी एका गुप्त अधिकाऱ्याला तैनात केलं. यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून अल्पवयीन मुलीची सुटका केली.
दरम्यान, पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकल्यानंतर सर्व माहिती उघडकीस आली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सिंग हा अल्पवयीन मुलींची विक्री करायचा, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सात हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपींविरुद्ध कलम ३६३ (ए), ३७० (ए) (१), ३७२ आणि ३४, तसेच महिला आणि अनैतिक वर्तनाशी संबंधित कलम ४ आणि ५ आणि कलम १६, १७ नुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली