मुंबई : युजीसी नेट परीक्षा १५ जानेवारी २०२५ रोजी पार पडणार होती, मात्र, ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, पण १६ तारखेला होणारी परीक्षा आहे त्याच शेड्युलप्रमाणं होईल, असं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. मकर संक्रांती आणि पोंगल हे दोन्ही सण एकामागून एक आल्यानं परीक्षा रद्द करण्यात आल्याचंही एनटीएकडून सांगण्यात आलं आहे.
ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक, पीएच.डी.साठी प्रवेश आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी नियुक्ती व्हावी, म्हणून 85 शाखेच्या परीक्षा 3 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान पार पडत आहेत. मात्र, मकर संक्रांती, पोंगल आणि इतर सणांमुळे 15 जानेवारी 2025 रोजी होणारी UGC-NET डिसेंबर 2024 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने केवळ 15 जानेवारी 2025 रोजी होणारी UGC-NET डिसेंबर 2024 ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान 16 जानेवारी 2025 रोजी होणारी परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार घेतली जाईल. त्यामुळे केवळ 15 जानेवारी रोजी होणारी UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक किंवा सहायक प्राध्यापकाची नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू असतात. मात्र, केवळ एम.एड. करुन या विद्यार्थ्यांना शिक्षकाची नोकरी मिळत नसून UGC-SET व NET परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे, या विद्यार्थ्यांकडून सेट व नेट परीक्षांची तयारी केली जाते. सहाय्यक प्राध्यापक आणि पीएच.डी.साठी प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. मात्र, ही 15 जानेवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.