Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Udhhav Thackeray: “महापौर आमचाच होईल!” उद्धव ठाकरेंचा मुंबईच्या निकालावर मोठा दावा; नाव न घेता फडणवीसांना टोला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 17 January 2026, 19:08
Udhhav Thackeray: "Mayor will be ours!" Uddhav Thackeray makes a big claim on Mumbai results; Tackles Fadnavis without naming him

मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या (Udhhav Thackeray) निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव (Mumbai Mahapalika Election) ठाकरे यांनी निकालांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईसह राज्यातील (Mumbai BMC Election Result) अनेक महापालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नसलं, तरी शिवशक्तीला मिळालेल्या मतांबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानत निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)

निवडणूक प्रचारादरम्यान सर्व महापालिकांमध्ये स्वतः उपस्थित राहू न शकल्याची कबुली देत उद्धव ठाकरे म्हणाले, “चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत, परभणीमध्येही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात शिवशक्तीला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराचा मी मनापासून आभारी आहे.”

 

मात्र, या निवडणुका अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या गेल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “साम-दाम-दंड-भेद वापरून ही निवडणूक लढवण्यात आली. मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा ही इच्छा होती आणि आजही आहे. पण आम्ही बहुमताचा आकडा गाठू शकलो नाही. तरीही आमच्या यशाने अनेकांच्या कपाळावर घाम फुटला,” असं म्हणत त्यांनी निकालाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला.

शिवाजी पार्कवरील सभांच्या तुलनेवरूनही ठाकरे यांनी विरोधकांवर टोले लगावले. “आमच्या सभेला शिवाजी पार्क फुलून गेलं, पण त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. मग आमच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत, आणि त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केलं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी म्हटलं की, “आमचे अर्धे नगरसेवक गळाला लावले गेले, पण आता ते गाळात गेले आहेत. भाजप कागदावर आहे, जमिनीवर नाही. आमचे निवडून आलेले नगरसेवक साधे आहेत, सामान्य लोकांमधले आहेत.”

मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी टीका करत सांगितलं की, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तिजोरी कशी रिकामी झाली याचा जाब मुंबईकरांच्या वतीने विचारतील. “देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल, मेवाची नाही,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. या निवडणुकांमधून शिवसेनेची ताकद कमी झाली असली, तरी पक्ष संपलेला नाही, हा संदेश देण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52
Next Post
Loni Kalbhor News: 15 thousand monthly salary hike for workers of Rama Agricultural Company in Loni Kalbhor

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील रामा कृषी कंपनीतील कामगारांना प्रतिमाह 15 हजार पगारवाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.