मुंबई : ठाकरे गटाचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपासून त्रास जाणवत होता. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे हे आज रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या हृदयात रक्तपुरवठा करणा-या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सांगितले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना 16 जुलै 2012 रोजी छातीत दुखू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा 2024 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.